Sunday, June 17, 2012

shalivahan raja



राजा शालिवाहन चा रेखा चित्र | 



राजा सातवाहन (शालिवाहन ) 
कुंभार परिवारात जन्मलेले राजा शालिवाहन ह्यांना लहान पण पासून घोडे, हत्ती, सैन्य, युद्ध अशे खेळांची आवड होती . सवंगडी सोबत खेळतांना ते माती चे घोडे, हत्ती बनवून युद्ध रंगवायचे. त्या काळी दक्षिण भारतावर सोमकांत राजा चे राज्य होते.  राजा सोमकांत व उज्जैनच्या राजा विक्रमादित्य याच्यात नेहमी राज्य विस्तारसाठी घमासान युद्ध होत होते. एका युद्धात राजा विक्रमादित्य ने पैठण संयाची धूळधाण करत पैठण काबीज केले. तरुण शालिवाहनाने हरलेल्या सैन्य व आपले सवंगडी सोबत घुवून काही काळाने राजा विक्रमादित्य ला धूळ चारत प्रतिष्ठान नागरी काबीज केली आणि तद नंतर ४५० वर्ष प्रतिष्ठान नगरीला दक्षिण भारताची राजधानी करत राज्यात शालिवाहन शक ची सुरवात केली. प्रतिष्ठान नागरी तशी पहिल्या पासून एक मोठे व्यापार केंद्र होते. संगीतकला, विन्काला, स्थापत्य कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकलेत निपुत कारागीर पैठण नगरीत वास्तव्य करीत होते. कलेला वाव मिळावा म्हणून राजा शालिवाहनाने प्रयत्न करत यश हि मिळवला, काही वर्षात प्रतिष्ठान नागरी हि नावलाव्किक झाली. 

No comments:

Post a Comment